Bharat Gogawale : ‘बाबा भरतशेठ+आघोरी विद्या = पालकमंत्री??’ महायुतीच्या नेत्याकडूनच खळबळजनक आरोप अन् VIDEO ट्विट
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर ठाकरेंच्या सेनेकडून त्यांच्यावर पलटवार करण्यात आला होता. मात्र आता सत्तेत सहभागी असलेल्या नेत्याकडूनच खळबळजनक आरोप करण्यात आलाय.
शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात होता असं अप्रत्यक्षपणे भरत गोगावले यांनी म्हणत गंभीर आरोप केला होता. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते वसंत मोरे यांच्याकडून पलटवार करण्यात आला होता. ‘भरत गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केली या अघोरी पुजेसाठी गुवाहाटीच्या बगलामुखी येथून महाराज आणून गोगावले यांनी निवडणुकीच्या पूर्वी अघोरी पूजा केली’,असा खळबळजनक आरोप वसंत मोरे यांच्याकडून करण्यात आला त्यानंतर आता महायुतीच्या सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्याकडून भरत गोगावलेंचा आणखी एक दुसरा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. यामध्येही सूरज चव्हाण यांनी गोगावलेंवर अघोरी विद्येचा आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी थेट व्हिडीओच ट्विट करत बाबा भरतशेठ + आघोरी विद्या = पालकमंत्री ?? असा सवाल केला आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

