Mlegaon Sakhar Karkhana Result : अजितदादांच्या पॅनलचे आणखी 2 उमेदवार विजयी
Mlegaon Sakhar Karkhana Result Updates : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी सुरू असून सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पॅनल आघाडीवर आहे.
माळेगाव साखर कारखाना निवडणूक मतमोजणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलच्या आणखी 2 उमेदवारांचा विजय झाला आहे. नितीन शेंडे आणि विलास देवकाते यांचा विजय झाला आहे. यापूर्वी काल रतनकुमार भोसले यांचा देखील विजय झालेला होता. त्यामुळे आतापर्यंत खुद्द अजित पवार आणि त्यांच्या 3 उमेदवारांचा विजय झालेला असून अजित पवारांचं पॅनल आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे.
दरम्यान, बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे अद्याप देखील ही मतमोजणी सुरूच आहे. आता तब्बल या मतमोजणीला 22 तास ओलांडले आहेत. विशेष म्हणजे पहिली फेरीचे मतमोजणीची प्रक्रिया ही जवळपास पहाटेच्या सुमारास संपली. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडले होते. दरम्यान, आज मतमोजणी पूर्ण होऊन अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

