नेमका कशामुळे झाला अजितदादांचा अपघात? अहवालात काय?

नेमका कशामुळे झाला अजितदादांचा अपघात? अहवालात काय?

| Updated on: Mar 01, 2026 | 10:34 AM

अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आला आहे. त्यात फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याचे नमूद आहे. कमी दृश्यमानता असतानाही विमान उतरवण्याचा प्रयत्न केला गेला, ज्यामुळे अपघाताला कारणीभूत ठरू शकते असे म्हटले आहे. सुनेत्रा पवारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आता समोर आला आहे. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ झालेल्या या घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल जाहीर झाला. अहवालानुसार, विमानाचे फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) उष्णतेमुळे खराब झाले होते, परंतु एफडीआरमधील डेटा दिल्लीतील एएआयबीच्या लॅबमध्ये डाऊनलोड करण्यात आला आहे.

अपघातापूर्वी दोन्ही वैमानिकांची ब्रेथ अनालायझर टेस्ट निगेटिव्ह आली होती. विमान प्रथम झाडांना धडकले आणि नंतर जमिनीवर आदळले. त्यावेळी विमानात सुमारे अडीच हजार लिटर इंधन होते. पुणे हवामान विभागानुसार, लँडिंगच्या वेळी दृश्यमानता 2000 मीटर होती, तर नियमानुसार 5000 मीटर दृश्यमानता आवश्यक असते. बारामती विमानतळाच्या एटीसीने वैमानिकांना 3000 मीटर दृश्यमानता असल्याचे सांगितले होते. क्लिअरन्स मिळाल्यानंतर 14 सेकंदात वैमानिकांनी ओ शिट, ओ शिट असा आवाज केला आणि विमान कोसळले. हे विमान रनवेपासून 50 मीटर डाव्या बाजूला बाहेर आदळले.

Published on: Mar 01, 2026 10:34 AM
Follow Us