ज्यूनिअर म्हणाणाऱ्या अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर उधळली स्तुतीसुमने
ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच आज गडचिरोलीत एका सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले. यावेळी गडचिरोलीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात तिन्ही नेत्यांनी एकमेकांचे कौतूक करताना जनतेला संबोधित केलं.
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी राजकीय भूकंप करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच आज गडचिरोलीत एका सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले. यावेळी गडचिरोलीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात तिन्ही नेत्यांनी एकमेकांचे कौतूक करताना जनतेला संबोधित केलं. मात्र याच्याआधी एकमेकांवर पोतळी सोडून या नेत्यांनी टीका केली आहे. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा कधी काळी ज्यूनिअर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही असा पवित्रा घेतला होता. मात्र आता 2023 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतूक केलं आहे. या कार्यक्रमात अजित पवार यांनी शिंदे यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख केला. यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

