Ajit Pawar : आम्ही बोलायला खंबीर…दादांनी मिटकरी अन् हाकेंना झापलं, बघा नेमकं काय म्हणाले?
गेल्या काही दिवसात अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात सातत्याने शाब्दिक युद्ध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अजित पवारांनी दोन्ही नेत्यांना झापलं आहे.
पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना चांगलंच झापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि लक्ष्मण हाके यांच्या शाब्दीक युद्ध होताना दिसतंय. यावेळी टीका करताना त्यांच्या भाषेचा स्तर देखील खालवाल्याचे दिसून आले. यावरून अजित पवारांनी हाके आणि मिटकरींना झापलं असून एकत्र येण्याबाबत आम्ही बोलायला खंबीर आहोत, अशी तंबीच अजित पवार यांच्याकडून अमोल मिटकरी यांनी देण्यात आली आहे. तर काहीजण जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत, अशी टीका अजित पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केली आहे. लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आक्रमक झाले. अशातच लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेबाबत माफी मागावी अशी मागणी देखील केल्याचे पाहायला मिळाले होते.

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात घमासान, अॅम्ब्युलन्स, मुडदा अन्...

मनसे युतीबाबत ठाकरे सकारत्मक, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिला एकच आदेश

हिंदी बोलेंगे, पढेंगे कोई रोक सके तो..,सदावर्तेंचं राज ठाकरेंना चॅलेंज

एअर इंडियाच्या पक्षी धडकला अन्... आणखी एक दुर्घटना टळली, बघा काय घडलं?
