Ajit Pawar : अय हे बघ मी काय मनकवडा नाहीये… ते विचार पक्षाला मान्य नाही, दादा संग्राम जगतापांना नोटीस पाठवणार
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार संग्राम जगताप यांच्या विचारांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे विचार पक्षाला मान्य नसल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली जाईल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संग्राम जगताप यांचे विचार पक्षाला अजिबात मान्य नाहीत, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. त्यामुळे संग्राम जगताप यांना लवकरच कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अरुण काका जगताप यांच्या हयातीत परिस्थिती सुरळीत होती, मात्र आता वाढलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून वागणे आवश्यक आहे, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले. यापूर्वी एका कार्यक्रमात जगताप यांना सुधारणा करण्याची सूचना केली होती, परंतु त्यात बदल दिसला नाही असे पवार म्हणाले.
राज्यातील जनतेला दिवाळीपूर्वी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याबाबतही त्यांनी माहिती दिली. निधी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचवण्याचे निर्देश अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव गोपी गुप्ता यांना देण्यात आले आहेत. वादळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक मदत तत्परतेने करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

