VIDEO : बैठकीतच अजित पवार भडकले; कार्यकर्त्यांना झापतच म्हणाले; “..आमची बदनामी होते, पद देणार नाही”
राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राज्यभर आढावा बैठकीचा सपाटा लावला जात आहे. अशीच पुण्यात घेण्यात आली. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगलच झापलं. तसेच थेट कानाखाली आवाज काढू असा दमच भरला.
पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील सर्वच पक्ष चाचपणीम करताना दिसत आहेत. त्याचधर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राज्यभर आढावा बैठकीचा सपाटा लावला जात आहे. अशीच पुण्यात घेण्यात आली. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगलच झापलं. तसेच थेट कानाखाली आवाज काढू असा दमच भरला. त्यामुळे सध्या पुण्याच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालिची चर्चा रंगली आहे. या बैठकीत अजित पवारांनी सभेसाठी जास्तीत जास्त लोक आणण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. तेव्हा, जबाबदारीने काम करा, गट बाजी करत बसू नका. नाहीतर एकेकाच्या कानाखालीच आवाज काढेन, बाकी काही नाही. तुमची बदनामी होत नाही, बदनामी आमची होते. शरद पवारांची बदनामी होते. मी पदाचा राजीनामा घेईन असं सुवानलं.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

