Ajit Pawar Video : '...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा

Ajit Pawar Video : ‘…तर पक्षातून हकालपट्टी’, अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा

| Updated on: Jan 20, 2025 | 11:25 AM

राष्ट्रवादीच्या शिर्डीतील शिबिरातून अजित पवार यांनी नेत्यांना सूचना देत इशाराही दिलाय. तसंच राष्ट्रवादीत आगामी काळात मोठे फेरबदल होण्याचे देखील संकेत शिर्डीच्या शिबिरातून देण्यात आले.

शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरातून अजित पवारांनी पक्षातील नेत्यांना स्पष्ट सूचना देत इशारा दिलाय. जनमानसात खरा प्रतिमा असलेल्या लोकांना पक्षात घेऊ नका अशा थेट सूचना अजित दादांनी दिल्यात. दरम्यान चुकीचं काम करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल असा गंभीर इशाराही दादांनी दिला. राष्ट्रवादीच्या शिबिरात माजी आमदार नवाब मलिक यांनी देखील आपली भूमिका मांडली. बीड प्रकरणावरून पक्षाची बदनामी होतेय असं मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ‘एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि नेतृत्वाची बदनामी होतेय नवाब मलिक यांच वक्तव्य. आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी पक्षाच्या हिताची नाही. पक्ष नेतृत्वानं लवकरच पक्षाच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा’, अशी मलिकांची भूमिका आहे. राष्ट्रवादीच्या शिबिरात मलिकांनी बीड प्रकरणावर भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित दादा राष्ट्रवादीत भाकरी फिरवणार अशी देखील चर्चा आहे. राष्ट्रवादी आपल्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. शिर्डीच्या शिबिरातून अजित पवारांनी पालिका निवडणुकीचाही रणनीती फुंकले. तसेच राष्ट्रवादीत फेरबदलाचे संकेतही देण्यात आलेत. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमके कोणते बदल होणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Published on: Jan 20, 2025 11:25 AM