Dhananjay Munde video : पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेच्या शपथविधीवरून मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित दादांना त्याच वेळी सांगितलं होतं की हे षड्यंत्र आहे, त्यामुळे शपथविधी करू नका, मात्र दादांनी ऐकलं नाही असं धनंजय मुंडे म्हणाले.
शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीरातून पहाटेच्या शपथविधीवरून मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पहाटेचा शपथविधी हे षड्यंत्र आहे, तुम्ही जाऊ नका, असं अजित पवारांना सांगितलं होतं. मी त्यांच्या पाया पडलो पण दादा म्हणाले काही होत नाही. सुनील तटकरे साक्षीदार असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले. तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षड्यंत्र सुरू झालं असा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केला आहे. फडणवीसांच्या जून २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवरून धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी सुनील तटकरेंनी त्यांना खुणावलं आणि त्यानंतर मुंडेनी आपल्या भाषणाचा सूर बदलला अशी माहिती आहे. मुंडे जेव्हा बोलत होते त्या भाषणाच्या प्रक्षेपणाची मुभा नव्हती मात्र भाषणानंतर बाहेर आल्यानंतर आपण जे काही बोललो ते सत्य आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली. तर अजित पवारांनी मध्यंतरी जे वावटळ उठलं होतं ते धनंजय मुंडे यांनी शांत केल्याचं म्हटलं आहे. २०१९च्या विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीची स्थापना होत असतानाच पहाटेच फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला आणि अजित पवारांनी काका शरद पवारांसह काँग्रेसलाही धक्का दिलेला होता. मात्र ७२ तासातच अजित पवार मागे फिरेले आणि फडणवीसांच सरकार पडलं. आता हा संपूर्ण घटनाक्रम म्हणजेच षड्यंत्र होतं हे धनंजय मुंडे यांनी सांगितलंय. बघा काय म्हणाले धनंजय मुंडे?

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
