AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुने शहर व डाबकी रोड परिसरात अजुनही जमाबंदीचं? दंगल भाग वगळता बाकी शहरात संचारबंदी कायम की...?

जुने शहर व डाबकी रोड परिसरात अजुनही जमाबंदीचं? दंगल भाग वगळता बाकी शहरात संचारबंदी कायम की…?

| Updated on: May 18, 2023 | 12:51 PM
Share

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटात वाद होऊन दंगल उसळली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची तोडफोडही झाली होती. दरम्यान अफवा पसरू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

अकोला : अकोल्यातील हरिहरपेठ भागात 13 मे च्या उसळलेल्या दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर त्या भागात संचारबंदी लावण्यात आली. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटात वाद होऊन दंगल उसळली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची तोडफोडही झाली होती. दरम्यान अफवा पसरू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. तर आता पर्यंत 300 जणांनवर कारवाई करण्यात आली असून 150 जणांची कारागृहातरवांगी करण्यात आली आहे. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यादरम्यान आता अकोल्यातील दंगल भाग वगळता शहरातील जमावबंदी उठवण्यात आली आहे. जुने शहर व डाबकी रोड पोलीस स्टेशन येथील संचारबंदी कायम ठेवत इतर ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे. हा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला. त्यामुळे आता अकोल्यातील हरिहरपेठ भाग आणि दंगल क्षेत्र सोडून इतर ठिकाणी जनजीवन पुर्वपदावर येत आहे.

Published on: May 18, 2023 12:51 PM