महिला शक्तीचा एल्गार! दारू विक्री होणाऱ्या ठिकाणी तोडफोड अन् राडा
अकोला जिल्ह्यातील गुढी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीविरुद्ध आक्रमक आंदोलन केले. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या महिलांनी दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवर छापा टाकून दारूचा साठा नष्ट केला.
अकोला शहरालगतच्या गुडधी गावात अवैध दारू विक्रीविरोधात महिलांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केले. गावात बेकायदा दारू विक्री बंद व्हावी, यासाठी यापूर्वी अनेकदा मागणी करण्यात आली होती. परंतु, प्रशासन आणि पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या महिलांनी स्वतः पुढाकार घेतला. गावातील महिलांनी एकत्र येऊन दारू विक्री होणाऱ्या घरांवर छापा टाकला आणि तिथला दारूचा साठा उद्ध्वस्त केला.
यापूर्वी, गुडधी गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे चिडलेल्या महिलांनी आज दारू विक्रीच्या ठिकाणी असलेले टीन शेड आणि हातगाड्यांची तोडफोड केली. गावातील दारूच्या गुत्त्यावर महिलांनी प्रचंड गोंधळ घातला, ज्यामुळे दारू विक्रेत्यांची चांगलीच धांदल उडाली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

