Pravin Darekar LIVE | दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या, प्रवीण दरेकरांची मागणी

कोरोनामुळे मागील बराच काळ मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन निर्बंधाखाली धावत आहे. दरम्यान या निर्बंधामध्ये शिथिलता आणण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

मागील बराच काळापासून कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोनामुळे मागील बराच काळ मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनही निर्बंधाखाली धावत आहे. दरम्यान कोरोनासह उपासमारीचा सामान्य व्यक्तीला त्रास होऊ नये यासाठी दोन डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेनने प्रवासाची मुभा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.