Ambadas Danve : शिंदेंच्या पक्षात अनेक लोकं भाजपचे अन्… अंबादास दानवे यांच्या दाव्यानं खळबळ
अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अनेक भाजपचे लोक असल्याचा दावा केला आहे. मुलजी पटेल यांच्यासारखे नेते शिंदे यांचा फोटो वापरत नसल्याचे त्यांनी म्हटले.
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अनेक भारतीय जनता पक्षाचे (भाजप) कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंबईतील मुरजी पटेल हे शिंदे यांचा फोटो बॅनरवर न लावता नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो वापरतात, असे उदाहरण त्यांनी दिले. मुरजी पटेल हे आजही भाजपचे सरचिटणीस असल्याचे दानवेंनी नमूद केले. संजना जाधव यांच्यासारख्या नेत्यांचाही त्यांनी उल्लेख केला, ज्या शिंदे सेनेच्या नाहीत असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक लोक हे भाजपचे उमेदवार असल्याचे दानवेंनी म्हटले. सध्याचा शिंदे गट म्हणजे केवळ एक फुगा असून, तो कधीही फुटू शकतो, असा दावाही दानवेंनी केला.
Published on: Nov 22, 2025 03:11 PM
Latest Videos
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

