संसद भवनाच्या उद्धाघाटनावरून ठाकरे गटाच्या नेत्याची सडकून भाजपवर टीका; म्हणाले, ”सत्ताधारी हे बापाची…”
संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित न केल्याबद्दल विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यावरून मोदी सरकारने आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता.
मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळा पार पडला. मात्र यावरून वाद निर्माण झाला आहे. संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित न केल्याबद्दल विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, यावरून मोदी सरकारने आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी भाजपसह पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. आताही याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देकील टीका केली आहे. तसेच त्यांनी हा देश आपल्या बापाची जहागिरी असल्याप्रमाणे सत्तेत असणारे लोक वागत असल्याची टीका केली आहे. तर या भवनाचं राष्ट्रपती यांनीच उद्घाटन केलं पाहिजे होत एवढचं आपलं म्हणण होतं असेही ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियात सभा झाली. त्यानंतर काही तिथल्या सरकारणने हिंदुस्थानातील काही राज्यातील विध्यार्थ्यांना त्यांच्या देशात यायला बंदी का केली याची सर्वांनी माहिती घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे. तर संसंदेतील मोदी यांच्या भाषणावर टीका करताना, कर्नाटकमधील सभेसारखं तिथे भाषण केलं असा टोला लगावला आहे.





