Danve – Shirsat : तुझं माझं जमेना अन्..! मंत्री शिरसाट आणि अंबादास दानवेंच्या दिलखुलास गप्पा, व्हिडीओ व्हायरल
Ambadas Danve - Sanjay Shirsat Viral Video : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
महाविकास आघाडीचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची एका लग्न समारंभात भेट झालेली बघायला मिळाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 10 मिनिटं चर्चा झाल्याचं समजलं आहे.
एक सत्ताधारी आणि दुसरे विरोधी असल्याने या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर सातत्याने ताशेरे ओढले जातात. नुकताच संभाजीनगरमधील एका हॉटेल खरेदीच्या वादावरून या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. दानवे यांनी केलेल्या आरोपांमुळे शिरसाट यांना या हॉटेल खरेदी प्रक्रियेतून माघार देखील घ्यावी लागली. असं असताना आज या दोन्ही नेत्यांची झालेली ही भेट आणि या भेटीत त्यांनी मारलेल्या गप्पा हा चर्चेचा विषय ठरत आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

