Bhim Jayanti Chaityabhoomi : राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिवादन
Governor, CM, DCM Pay Tribute On Chaityabhoomi : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत चैत्यभूमीवर भेट देऊन महामानवाला अभिवादन केलं आहे.
राज्यसह देशात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी होत आहे. याच निमित्त आज सगळीकडे जोरदार जयंती उत्सव साजरा केला जात आहे. मिरवणुका, आतिषबाजी, विद्युत रोषणाई आणि विविध सामाजिक कार्यक्रम आज ठेवण्यात आलेले आहेत. जयंतीनिमित्त मुंबईच्या चैत्यभूमीवर राजकीय नेत्यांसह भीम अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीच्या वरिष्ठ मंत्र्यांनी देखील चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं आहे.
Published on: Apr 14, 2025 10:41 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

