Ameya Khopkar | जास्मिन वानखेडे आमच्या पक्षात काम करतात याचा आम्हाला अभिमान : अमेय खोपकर

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या भगिनी जास्मिन वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन आता जोरदार राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या भगिनी जास्मिन वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. मलिक यांनी जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांना मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यापुढे जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेले बिनबुडाचे आरोप खपवून घेणार नाही, असा थेट इशारा दिलाय.

महाभ्रष्ट विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी आमच्या चित्रपट सेनेत काम करणाऱ्या जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केला होता. जास्मिन वानखेडे या आमच्या पक्षात काम करतात याचा आम्हाला अभिमान आहे. मनसे चित्रपट सेनेवर आरोप केले त्याचे पुरावे आहेत का? एनसीबीने तुमच्या जावयावर कारवाई केली त्याचा राग तुम्ही अशाप्रकारे काढणार का? असा सवाल खोपकर यांनी केलाय. मनसे जास्मिन वानखेडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचंही खोपकर यांनी आवर्जुन सांगितलं. त्याचबरोबर समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरच्या पाठीशीही मनसे उभी आहे, असंही खोपकर यांनी स्पष्ट केलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI