AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Shah Mumbai Visit | पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय आढाव्यासह दोन महत्त्वाचे कार्यक्रम, राजकीय घडामोडींना वेग

Amit Shah Mumbai Visit | पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय आढाव्यासह दोन महत्त्वाचे कार्यक्रम, राजकीय घडामोडींना वेग

| Updated on: Aug 08, 2026 | 10:08 AM
Share

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनामुळे त्यांचा दौरा चर्चेत राहिला होता. आता पुण्यानंतर अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत दोन महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत.

अमित शाह मुंबई विभागीय भाजप तसेच प्रदेश भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेणार असून, या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. आगामी राजकीय घडामोडी, पक्षाची संघटनात्मक स्थिती आणि महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमित शाह यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. सहकार क्षेत्राला बळकटी देण्याच्या उद्देशाने या संस्थेचे नवीन कार्यालय उभारण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्याला सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ पदाधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यानंतर अमित शाह मुंबई शेअर बाजारातील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून सहकार आणि आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांशी अमित शाह संवाद साधणार असल्याची माहिती आहे.

अमित शाह यांच्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यादरम्यान राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या या मुंबई दौऱ्याकडे केवळ सहकार आणि आर्थिक क्षेत्राच्या दृष्टीनेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातूनही विशेष लक्ष लागले आहे.

Published on: Aug 08, 2026 10:08 AM

Follow Us