AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाहांनी वाचली यूपीए सरकारच्या काळात पाकिस्तानात पळून गेलेल्या दहशतवाद्यांची यादी

अमित शाहांनी वाचली यूपीए सरकारच्या काळात पाकिस्तानात पळून गेलेल्या दहशतवाद्यांची यादी

| Updated on: Jul 29, 2025 | 2:20 PM
Share

गृहमंत्री अमित शाह यांनी आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करताना यूपीए सरकारवर टीका केली आहे.

आमच्या काळात झालेले हल्ले पाकिस्ताना प्रेरित आणि काश्मीर सेंट्रीक हल्ले झाले. २०१४ ते २०२५ पर्यंत एकही दहशतवादी हल्ला झाला नाही. हे नरेंद्र मोदी सरकार आहे. काश्मीरमध्येही आजची स्थिती आहे. पाकिस्तानातून त्यांना अतिरेकी पाठवावे लागत आहेत. काश्मीरमध्ये अतिरेकी तयार होत नाही, असं गृहमंत्री अमित शाह यांनी आज संसदेत बोलताना म्हंटलं आहे. आज लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात आली. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती देत विरोधकांना धारेवर धरलं.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, मी सलमान खुर्शीद यांना टीव्हीवर रडताना पाहिलं होतं. ते सोनिया गांधींच्या घरातून बाहेर पडले. बाटला हाऊसच्या हल्ल्यामुळे सोनिया गांधी रडल्या. रडायचं होतं तर शहीद शर्मासाठी रडायचं होतं. तुम्ही बाटला हाऊसच्या अतिरेक्यांसाठी रडता? तुम्हाला काय अधिकार आहे आम्हाला विचारण्याचा? असा घणाघाती प्रश्न देखील यावेळी अमित शाह यांनी विरोधकांना विचारला. पुढे शाह यांनी सांगितलं की, दाऊद १९८६मध्ये पळाला राजीव गांधींचं सरकार होतं. सय्यद सल्लाउद्दीन ८३ पळाला, टायगर मेमन ८३ला पळाला, अनिस इब्राहीम कासकर १९८३ला पळाला, रियाज भटकळ २००७मध्ये पळाला, इक्बाल भटकर २०१० मध्ये पळाला, मिर्जा सादाब बेग २००९मध्ये पळाला यांचं सरकार होतं. माझं उत्तर मागितलं. आमच्या सुरक्षा दलाने माझं उत्तर दिलं. आता राहुल गांधींनी याचं उत्तर द्यावं, असंही अमित शाह म्हणाले.

Published on: Jul 29, 2025 02:19 PM