Sanjay Raut यांच्या आरोपांवर Amol Kale यांचं स्पष्टीकरण

| Updated on: Feb 17, 2022 | 7:17 PM

मी सरकारचं कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. तसेच माझ्याबाबतचा सर्व तपशील आयटीच्या विवरणात दिलेलं आहे, असं सांगतानाच मी परदेशात पळून गेल्याची काही लोकांनी अफवा पसरवली आहे. ज्यांनी ही अफवा पसरवली त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे, असं अमोल काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

Follow us on

YouTube video player

नागपूर: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी अमोल काळे (amol kale) यांच्यावर आरोप केले होते. काळे आणि भाजपचं साटंलोटं असून त्यांनी घोटाळे (scam) केल्याचाही आरोप करण्यात आला होता. काळे हे परदेशात पळून गेल्याचा दावाही काही राजकीय नेत्यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर काळे यांनी थेट टीव्ही9 मराठीकडे खुलासा पाठवला आहे. मी एक खासगी व्यावसायिक आहे. मी सरकारचं कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. तसेच माझ्याबाबतचा सर्व तपशील आयटीच्या विवरणात दिलेलं आहे, असं सांगतानाच मी परदेशात पळून गेल्याची काही लोकांनी अफवा पसरवली आहे. ज्यांनी ही अफवा पसरवली त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे, असं अमोल काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.