Amol Mitkari | मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्रीपद बघाव लागल मिटकरींचा फडणवीसांना टोला

भाजपच्या निर्णयाचे विश्लेषण अगदी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, संजय राऊत यांनी विश्लेषण केले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर ब्रेक लावण्याचेा हेतू असल्याचेही सांगण्यात आले. तर यावेळी अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्रीपद बघावं लागलं असा फडणवीसांनाही टोला लगावला.

महादेव कांबळे

|

Jul 01, 2022 | 11:19 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या गोठात आनंदाला उधान आले आणि चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पेढे भरून कौतुकही केले. मात्र त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत दाखल झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले. राज्याला खरं तो राजकीय मोठा धक्का होता. त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी आपण मंत्रि मंडळाबाहेर असणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मात्र त्यांनी घेतलेला हा निर्णय जास्त काळ राहिला नाही. या निर्णयानंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस या मंत्रिमंडळात काम करतील असं ट्विट केले. तोही खरं तर महाराष्ट्रासाठी मोठा धक्काच होता.  भाजपच्या निर्णयाचे विश्लेषण अगदी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, संजय राऊत यांनी विश्लेषण केले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर ब्रेक लावण्याचेा हेतू असल्याचेही सांगण्यात आले. तर यावेळी अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्रीपद बघावं लागलं असा फडणवीसांनाही टोला लगावला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें