Amol Mitkari | शहरांची नावे बदलून विकास होत नाही – अमोल मिटकरी

शहरांची नावे बदलून विकास होत नाही. औरंगाबाद आणि संभाजीनगर हा मुद्दा महत्वाचा असला तरी नावे बदलून हिंदू समर्थक किंवा विरोधक ठरत नाही. टप्प्याटप्प्याने नावे बदलू आणि बदलणारच. ज्यांना नावे बदलण्यासाठी वेठीस धरायचं आहे. त्यांनी गुजरातमधील नावे मोदी यांच्याकडून बदलून घ्यावी, असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. ते आज उस्मानाबादमध्ये बोलत होते.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. औरंगाबादला संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय असं दिसतंय, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

जनाब संजय राऊत, महाराष्ट्रात औरंगजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहिली जाते आणि त्यावरुन उस्मानाबादेत दंगे होतात. तुमचा महाराष्ट्रातील कमकुवतपणा आणि लाचारी लपवण्यासाठीच तुम्ही भाजपला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहिता. जनाब राऊत, तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरुन उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान आणि औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल. ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची आणि हिंदुत्वाची शान असलेला भागवा ध्वज लावण्यावरुन जर उस्मानाबादमध्ये पोलिसांवर दगडफेक होते. त्यावेळी एरवी उस्मानाबादला धाराशिव करु म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय? असा सावलही पडळकर यांनी केला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI