अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. नवजात शिशु अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर स्फोटामुळे लागलेल्या या आगीत तीन नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा बाळांवर उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील अग्निशमन अलार्म यंत्रणा कार्यान्वित नव्हती, ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
अमरावतीमध्ये स्त्री जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास नवजात शिशु अतिदक्षता विभागामध्ये (NICU) व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर सहा बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अमरावती शहरात शोककळा पसरली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील आग लागल्यास धोक्याची सूचना देणारी फायर अलार्म यंत्रणा कार्यान्वित नव्हती. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या आणि एक वर्षापूर्वीच कार्यान्वित झालेल्या या रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा निष्क्रिय असणे हे गंभीर प्रश्न निर्माण करते. जर फायर अलार्म सुरू असता तर आग वेळेत नियंत्रणात आणता आली असती, असे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेने रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Published on: Aug 24, 2026 10:02 AM
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल

