पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही!; नवनीत राणा यांचं टीकास्त्र
Navneet Rana on Uddhav Thackeray : खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत? पाहा सविस्तर...
अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलण्याची लायकी उद्धव ठाकरे यांची नाही. उद्धव ठाकरेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्ञान देण्याची गरज नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत. उद्धव ठाकरे पंतप्रधानांवर टीका करतात, हे योग्य नाही. ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवलं ते काय पंतप्रधानांवर टीका करतात. पंतप्रधानांवर टीका करणं योग्य नाही त्याला उत्तर देण्यासाठी देशाची आणि महाराष्ट्राची जनता सक्षम आहे, असंही त्या म्हणाल्या. 33 महिने मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नाव ते संभाजीनगर करू शकले नाहीत. दंग्याच्या बातम्या पाहून मनाला वेदना होतात. 33 महिन्याच्या सरकारमध्ये अमरावती दंगा झाला, असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

