नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, व्हॉटसअपवर एक क्लिप पाठवून दिली धमकी अन्…
खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून राणांना धमकी आल्याची माहिती मिळत आहे. नवनीत राणा यांना व्हॉटसअपवर एक क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे.
अमरावती, ६ मार्च २०२४ : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून राणांना धमकी आल्याची माहिती मिळत आहे. नवनीत राणा यांना व्हॉटसअपवर एक क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी या प्रकरणासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर फोन कॉल करणाऱ्या इसमा विरुद्ध कलम 354 A,354 D,506 (2), 67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आगे. दरम्यान, नवनीत राणा या आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. तर यापूर्वी सुद्धा खासदार नवनीत राणा यांना अशा प्रकराच्या धमक्या आल्याचे पाहायला मिळाले होते.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

