चक्क विहिरीतून निघतंय उकळतं पाणी ! कुठं नागरिकांनी व्यक्त केलं आश्चर्य?
VIDEO | घरातील विहिरीतून गेल्या चार दिवसांपासून येतंय उकळतं पाणी? बघा व्हिडीओ
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बेनोडा येथील स्थानिक असलेले हरिशचंद्र संपतराव वाघ यांच्या घरातील विहिरीला मागील तीन ते चार दिवसांपासून अचानकपणे उकळतं पाणी येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. हा काहीतरी दैवी चमत्कार असल्याच्या अफवासुद्धा पसरल्याचे पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच बेनोड्याचे सरपंच, उपसरपंच यांनी भेट देऊन महसूल विभागाला माहिती दिली. त्यानंतर अनुषंगाने तहसीलदारांनी पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना घटनास्थळी पाठवून पाण्याचे नमुने भूगर्भशास्त्र विभागाकडे तपासणीसाठी पाठविले. अहवाल येईपर्यंत या विहिरीचे पाणी वापरण्यात मनाई केली आहे. मोटारपंपाने खेचलेले पाणी गरम लागल्याने विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे वाघ यांना समजले. ही वार्ता संपूर्ण गावात पसरल्यानतंर सर्वच जण या पाण्याची चाचपणी करत आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

