नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्…
अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र पाठवण्यात आलं असून या पत्रात नवनीत राणा यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीच्या आणि अश्लील भाषेचा उल्लेख आहे. बघा नेमकं काय म्हटलंय?
अमरावतीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. राणा दाम्पत्यानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली असताना अशातच त्यांचं मानसिक खच्चिकरण करण्याचा प्रयत्न कोण्या एका अज्ञात इसमांकडून कऱण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना धमकीचं पत्र पाठवण्यात आलं आहे. नवनीत राणा यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात अश्लिल भाषेचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नवनीत राणा यांना अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीच्या आणि अश्लील भाषेचा उल्लेख करत धमकीच पत्र पाठवल्यानंतर नवनीत राणांच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले असताना या प्रकरणी पोलीस काही कारवाई करतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
