26 सेकंदाचा ‘तो’ आक्षेपार्ह व्हिडिओ केला पोस्ट अन् अंगाशी आलं, दोघांविरोधात गुन्हा दाखल
VIDEO | अकोल्यातील राड्यानंतर अमरावती पोलीस अलर्ट मोडवर, 'ती' पोस्ट केल्यानं दोघांविरोधात गुन्हा दाखल
अकोला : अकोल्यात सोशल मीडियाच्या एका पोस्टवरून मोठ्या प्रमाणात दोन गटांमध्ये राडा झाला होता. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. तर या दगडफेकीमध्ये आठ जण आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. अकोल्यातील राड्याप्रकरणी पोलिसांनी 75 जणांना ताब्यात घेतलं आहे. शहरात तीन दिवसांपासून 144 कलम लागू करण्यात आला. अकोल्यातील या घटनेनंतर आता अमरावती पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. सोशल मिडीयावर जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट केल्याने दोघांविरोधात अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. ही पोस्ट एका आक्षेपार्ह व्हिडीओ स्वरूपात होती आणि अमरावतीच्या नावाने ती व्हायरल केल्यानं अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 सेकंदाचा तो आक्षेपार्ह व्हिडिओ अमरावतीच्या नावाने पोस्ट करणं त्या दोघांच्या चांगलंच अंगाशी आलंय. दरम्यान, अकोल्यात आज सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदी आणि रात्री 8 वाजेपासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दोन दिवसांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा ही सुरु करण्यात आली आहे.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं

