देवाच्या कृपेनं जे व्हायचं ते होतं; सत्ता संघर्षावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वनिता कांबळे

|

Sep 27, 2022 | 5:55 PM

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाचा वादबाबत सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. सुप्रीम कोर्टातील सुनावणी बाबात मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायदेवेतेवर विश्वास आहे असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थिगिती द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें