रिल्स बनवणं आलं अंगाशी ! चालत्या गाडीवर अंघोळ करणाऱ्या स्टारचा माफीनामा, म्हणाला…

VIDEO | चालत्या गाडीवर अंघोळ करण्याचं रिल्स बनवणं पडलं महागात, अखेर रिल स्टारनं मागितली माफी

रिल्स बनवणं आलं अंगाशी ! चालत्या गाडीवर अंघोळ करणाऱ्या स्टारचा माफीनामा, म्हणाला...
| Updated on: May 24, 2023 | 12:28 PM

ठाणे : उल्हासनगरमध्ये काही दिवसांपूर्वी आदर्श शुक्ला या रिल स्टारने भररस्त्यात चालत्या गाडीवर अंघोळ करतानाचा व्हिडीओ चित्रित केला होता. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर रिलच्या स्वरूपात टाकण्यात आल्यानंतर तो चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओची माध्यमांनीही दखल घेतल्यानंतर पोलिसांनी आदर्श शुक्ला आणि त्याच्यामागे बसलेल्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा फक्त दंडनीय असला, तरी त्यातून इतरांनी असं कृत्य न करण्यासाठी पोलिसांनी आदर्श याच्याकडून एका व्हिडिओतूनच माफीनामा तयार करून घेतलाय. या व्हिडिओत माझा इतरांना इजा पोहोचेल असा हेतू नव्हता, तर मी फक्त करमणूक म्हणून हा व्हिडीओ चित्रित केला होता. मात्र हेल्मेट न घालता गाडी चालवणं, हात सोडून गाडी चालवणं आणि रस्त्यावर पाणी सांडून इतरांना इजा होईल असं कृत्य माझ्याकडून घडलं. त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. मला पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं, असं आदर्श शुक्ला हा या व्हिडिओत म्हणताना दिसतोय. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे बाहेरच चित्रित करण्यात आलेल्या या व्हिडिओत त्याच्यासोबत मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे एक अधिकारीही उभे असलेले पाहायला मिळतायत. या तरुणाने जरी करमणूक म्हणून व्हिडीओ चित्रित केला असला, तरी त्याने नियम मोडले असून त्याचा व्हिडीओ पाहून उद्या आणखी काही लोकांनी असे व्हिडीओ तयार करू नयेत, आणि त्यामुळे इतर कुणाला इजा होऊ नये, यासाठी आपण हा व्हिडीओ चित्रित करून घेतल्याचं यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितलं.

Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.