Anagar Nagar Panchayat Election : नाद करायचा नाही, दादांना राजन पाटलांच्या मुलाचं चॅलेंज… नंतर माफीनामा
सोलापूरच्या अनगर नगरपंचायत निवडणुकीत राजन पाटलांच्या मुलाने, विक्रांत पाटील (बाळराजे), उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिले. बिनविरोध विजयानंतर त्यांनी "नाद करायचा नाही" असे म्हटले होते, मात्र नंतर दिलगिरी व्यक्त केली. निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने नवा वाद निर्माण झाला असून, त्यांनी राजन पाटलांवर आरोप केले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणूक सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांनी निवडणुकीतील विजयाच्या जल्लोषात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आव्हान दिले होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. राजन पाटील आणि त्यांचे पुत्र बाळराजे पाटील हे निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते, मात्र नंतर राजन पाटील भाजपमध्ये सामील झाले.
अनगर नगरपंचायतीच्या १७ पैकी १७ जागा भाजपने बिनविरोध जिंकल्या, तर राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील नगराध्यक्षपदी निवडून आल्या. विजयाच्या जल्लोषात बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना आव्हान दिले होते, परंतु नंतर त्यांनी आणि राजन पाटलांनीही दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, ही निवडणूक केवळ आव्हानामुळेच नाही, तर राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यामुळेही चर्चेत आहे. उज्ज्वला थिटे यांनी आपला अर्ज हेतुपुरस्सर बाद केल्याचा गंभीर आरोप राजन पाटलांवर केला आहे. त्यांनी न्यायालयात दाद मागण्याची तयारी दर्शवली आहे.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

