Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या (PMLA) अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) आणि संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या (PMLA) अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी ईडीने काल (शुक्रवार) सकाळपासूनच छापेमारी सुरु केली होती. तब्बल 8 ते 9 तास ही छापेमारी चालली होती. नागपुरातील निवासस्थानी देशमुख कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर संध्याकाळ ईडीचे अधिकारी काही कागदपत्रांसह घराबाहेर पडले. तर देशमुख यांच्या दोन्ही खासगी स्वीय सहाय्यकांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा ईडीने दोघांनाही अटक केली.
Published on: Jun 26, 2021 08:19 AM
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
