Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटकेची शक्यता, सचिन वाझेचीही तळोजा कारागृहात चौकशी

अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी स्वीय सहाय्यकांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर आता त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटकेची शक्यता, सचिन वाझेचीही तळोजा कारागृहात चौकशी
अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 9:00 PM

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक संजीव पालांडे कुंदन शिंदे यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने छापेमारी सुरु केली होती. तब्बल 8 ते 9 तास ही चौकशी सुरु होती. यात नागपुरातील निवासस्थानी देशमुखांच्या कुटुंबियांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर संध्याकाळ ईडीचे अधिकारी काही कागदपत्रांसह बाहेर पडले. दुसरीकडे देशमुख यांच्या दोन्ही खासगी स्वीय सहाय्यकांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. चौकशीनंतर आता त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Possibility of arrest of both Anil Deshmukh’s personal sectretory by Enforcement Directorate)

देशमुख यांचे खासगी स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या कार्यालयात घेऊन जात या दोघांचीही चौकशी केली जात आहे. त्यानंतर आता त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझेचीही तळोजा कारागृहाच चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने जोरदार मोहिम हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

बार मालकांकडे चौकशी

एकीकडे ईडीकडून अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सकाळपासून छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. त्यात या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याचं कळंतय.

यापूर्वी सीबीआयकडून 10 ठिकाणी छापे

दरम्यान, सीबीआयने 21 एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.

संबंधित बातम्या :

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, काही बार मालकांचेही जबाब!

अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीची छापेमारी, शरद पवार म्हणतात, आम्हाला यत्किंचितही चिंता नाही!

शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.