देवेंद्र फडणवीस तुम्ही घाणरडे आणि.., अनिल देशमुख यांचा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा
नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून एक बॅनर लावण्यात आलं आहे. यावर विकास वृत्ती आणि वसुली बुद्धी असे म्हणत दोन भागात अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे. यामध्ये विकास वृत्ती म्हणून देवेंद्र फडणवीस आणि वसुली बुद्धी म्हणून अनिल देशमुख यांचा फोटो लावण्यात आला आहे.
फडणवीसजी तुम्ही घाणरडे आणि खालच्या थराचे राजकारण करत आहात, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं असून देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुढे अनिल देशमुख असेही म्हणाले की, याचा नवीन अंक आज नागपूरच्या जनतेला पाहायला मिळाला आहे. असं ट्वीट करून अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाकडून एक बॅनर लावण्यात आलं आहे. यावर विकास वृत्ती आणि वसुली बुद्धी असे म्हणत दोन भागात अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे. यामध्ये विकास वृत्ती म्हणून देवेंद्र फडणवीस आणि वसुली बुद्धी म्हणून अनिल देशमुख यांचा फोटो लावण्यात आला आहे. भाजपने असे बॅनर लावून अनिल देशमुखांवर निशाणा साधत डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे. तर यावर अनिल देशमुख यांनी ट्वीट करत भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी! महाराष्ट्रात तुम्ही किती घाणेरडे व खालच्या थराचे राजकारण करत आहात, याचा नवीन अंक आज नागपूरच्या जनतेला पुन्हा एकदा तुमच्या कडून पाहायला मिळाला. लक्षात असू द्या…जनता जनार्दन हैं!’, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.