Anil Gote : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा असल्यानं जाणीवपूर्वक अपमान, देवेंद्र फडणवीसांसह भाजपावर अनिल गोटेंची टीका

मुख्यमंत्री मराठा समजामधून आले आहेत. म्हणून त्याचा भाजपा जाणीवपूर्वक अपमान करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली, याचा गुजराती लोकांना मराठ्यांचा राग आहे, असे गोटे म्हणाले. 

प्रदीप गरड

|

Aug 03, 2022 | 3:17 PM

धुळे : मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून आधीच सांगितले होते, की हे लोक तुमच्यासोबत कसे वागतील, समोरून माइक काढून घेणे, जे सांगू तेच बोलणे, चिठ्ठी लिहून देणे, त्याप्रमाणे सुरू आहे,असे राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे (Anil Gote) म्हणाले आहेत. तुमच्या आमच्या युतीत तुमची पात्रता काय, हे दर्शवण्याचा प्रयत्न भाजपाने केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हलकट आणि कपटी माणूस आहे. याबद्दल एक एक सविस्तर प्रसंग सांगेन, असे गोटे म्हणाले. फडणवीसांचे नाव वर आणि यांचे खाली, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री मराठा समजामधून आले आहेत. म्हणून त्याचा भाजपा जाणीवपूर्वक अपमान करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली, याचा गुजराती लोकांना मराठ्यांचा राग आहे, असे गोटे म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें