Walmik Karad Video : वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणताय...

Walmik Karad Video : वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणताय…

| Updated on: Jan 23, 2025 | 11:40 AM

पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आलं आणि न्यायालयाने कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे वाल्मिक कराडची रवानगी बीडच्या सेन्ट्रल जेलमध्ये झाली. पण कराडला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा अशी मागणी अंजली दमानियांनी केली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्याचा आरोपी वाल्मिक कराड याला बीडच्या सेन्ट्रल जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर सीआयडीने कराडला कोर्टात हजर केले आणि त्यानंतर वाल्मिक कराडला न्यायालयाने कोठडी देण्यात आली आहे. सीआयडीने वाल्मिक कराडची कोठडी मागितली नाही. त्यामुळे कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयाने कोठडी सुनावली. पण गरज पडल्यास सीआयडी पुन्हा वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मागू शकते. श्वसनाच्या आजारामुळे कराडला सी पॅप या मशीनचा वापर करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. पण न्यायालयीन कोठडीवरून अंजली दमानिया आणि जरांगेनी काही सवाल उपस्थित केले आहेत. वाल्मिक कराडला न्यायालयाने कोठडी मिळाली असली तरी जामीन मिळणार नाही. कारण कराडवर मकोका लावण्यात आला आहे आणि मकोकात पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. किमान तोपर्यंत तरी मकोकात जामीन होत नाही. तर वाल्मिक कराड असो की त्याची टोळी कोणीही सुटणार नाही. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा होणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एक दिवसाआधीच आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयातील वाल्मिक कराड आणि सरपंच हत्येतील इतर आरोपींचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला ज्यात कृष्णा आंधळे सोडून सध्या अटकेत असलेले आरोपी हे एकाच वेळी दिसताय मात्र याच टोळीला वाचवण्याचा प्रयत्न मंत्री धनंजय मुंडे यांचा असल्याचा आरोप जरांगेनी केला.

Published on: Jan 23, 2025 11:40 AM