Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suresh Dhas Video : सरपंच हत्येनंतर धसांकडून परळीतील आणखी दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं

Suresh Dhas Video : सरपंच हत्येनंतर धसांकडून परळीतील आणखी दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं

| Updated on: Jan 22, 2025 | 5:39 PM

सरपंच हत्येनंतर सुरेश धसांकडून परळीमधील आणखी दोन खुनांचा खुलासा करण्यात आलाय. २२ ऑक्टोबर २०२३ ला महादेव मुंडे यांची परळीत हत्या करण्यात आली होती. तसंच परळीमध्ये एका कला शिक्षकाच्या मुलीला जाळून मारल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सरपंच हत्या प्रकरणानंतर भाजपा आमदार सुरेश धसांनी परळीतील दोन खुनांचा खुलासा केलाय. २२ ऑक्टोबर २०२३ ला महादेव मुंडे यांची परळीच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. हत्त्येतील आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. सुरेश धसांनी हा दावा केला. हत्त्येतील आरोपी वाल्मिक कराडच्या मुलाच्या आवतीभवती फिरतात असा आरोपही सुरेश धस करतायत. ‘कोणाचा अद्याप एकही आरोपी अटक केलेला नाही. आरोपी सुशील म्हणून जो आखाचा पोरागा आहे त्याच्या आवतीभवती फिरताना दिसतायत’, असं सरेश धस म्हणाले. हत्या प्रकरणात राजाभाऊ खोड आणि आरोपी सोडून इतर लोकांना आरोपी करा असही आकाने सानप यांना सांगितलं होतं. असं सुरेश धस म्हणतायत. मात्र पीआय सांनप यांनी नकार दिल्याने त्यांना परळीतून चालता केलं. आता ते धाराशिवमध्ये आहेत अशी माहिती सुरेश धसांनी दिली आहे. तर परळीत एका कला शिक्षकाच्या मुलीला जाळून मारलं सुरेश धसांनी हा देखील एक आरोप केलाय. मुलीच्या मृत्यूचा धक्का घेतल्या नंतर कला शिक्षकाने आत्महत्या केल्याचं धस सांगतात. तर शिक्षकाची बायको वेडी झाली मुलगा गायब झाला. दुसरी मुलगी लग्न करून गेली परत आलीच नाही अशी ही माहिती सुरेश धस देतायत.

महादेव मुंडे परळी तालुक्यामधील भोपळा या गावातील मूळ रहिवासी. महादेव मुंडे २०२२ च्या आसपास आंबेजोगाईमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे. महादेव दत्तु मुंडे यांची २२ ऑक्टोबर २०२३ रोजी परळी तहसील कार्यालयासमोर हत्या झाली. महादेव मुंडे यांच्या गळ्यावर आणि गालावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा होत्या. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा अद्यापही तपास सुरूच आहे. मात्र अजूनही कुणालाही अटक झालेली नाही, अशी माहिती मिळतेय

Published on: Jan 22, 2025 05:39 PM