Beed Case BIG Breaking : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख मर्डर केसमध्ये सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या महिनाभरापासून सापडत नसल्याने अखेर त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याला फरार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गेल्या महिनाभरापासून बीड हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा सापडत नसल्याने अखेर त्याला फरार घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण ६ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, विष्णू चाटे. प्रतिक घुले, महेश केदार आदींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र सध्या यातील कृष्णा आंधळे याला फरार घोषित करण्यात आलंय. असे असताना सीआयडी आणि एसआयटीचं पथक अजूनही आरोपी कृष्णा आंधळे याच्या मागावर असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. तर, दुसरीकडे खंडणीप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला बीड न्यायालयाकडून 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
