Anjali Damania : …असं म्हणूच कसं शकतात? शिरसाटांच्या ‘त्या’ व्हिडीओवर दमानियांकडून प्रश्नांची सरबत्ती, म्हणाल्या….
पैशांनी भरलेल्या बॅगांसह संजय शिरसाट यांचा व्हिडीओ माझ्याकडे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. यानंतर एकच खळबळ उडाली मात्र शिरसाटांनी राऊतांचा दावा फोल ठरवला. यानंतर दमानियांनी यावर भाष्य केले आहे.
संजय शिरसाट यांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील बॅगेत पैसे नसल्याचा दावा केला आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडीओवर भाष्य केलं आहे. दमानिया यांनी शिरसाटांचे व्हायरल होणारे व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, मला संजय शिरसाटांची कमाल वाटते. बॅगमध्ये चक्क पैसे दिसत असताना ते पैसे नाहीत, कपडे असतील असे ते म्हणूच कसे शकतात? असा सवाल दमानिया यांनी केला आहे. पुढे दमानिया असंही म्हणाल्या की, आजच्या आज माध्यमांनी त्यांच्या घरी जाऊन पाहावे की जी रूम व्हिडीओमझ्ये दिसत आहे ती खरंच त्यांच्या घरची आहे का? इतकंच नाहीतर मला ह्यात फक्त एक गोष्ट चुकीची वाटते की, कोणाच्याही बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावणे अतिशय चुकीचे आहे.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

