AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Damania | अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; चाकणकरांचे शेकडो कॉल्स का? अंजली दमानियांचे गंभीर आरोप, कॉल लिस्टमुळे राजकीय खळबळ

Anjali Damania | अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; चाकणकरांचे शेकडो कॉल्स का? अंजली दमानियांचे गंभीर आरोप, कॉल लिस्टमुळे राजकीय खळबळ

| Updated on: Apr 15, 2026 | 12:55 PM
Share

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी संबंधित संपर्कांबाबत मोठे दावे करत अनेक राजकीय व्यक्ती, पीए आणि अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. कालच त्यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण खुलासे करणार असल्याचे संकेत दिले होते. माध्यमांशी बोलताना दमानिया यांनी सांगितले की, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक (PI) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अशा सात अधिकाऱ्यांसह दोन RTO अधिकाऱ्यांचेही फोन कॉल्स या यादीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी संबंधित संपर्कांबाबत मोठे दावे करत अनेक राजकीय व्यक्ती, पीए आणि अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. कालच त्यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण खुलासे करणार असल्याचे संकेत दिले होते. माध्यमांशी बोलताना दमानिया यांनी सांगितले की, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक (PI) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अशा सात अधिकाऱ्यांसह दोन RTO अधिकाऱ्यांचेही फोन कॉल्स या यादीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “हे लोक अशोक खरात यांना वारंवार फोन का करत होते? शेकडो कॉल्स का झाले?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याच प्रकरणात त्यांनी काही राजकीय आणि प्रशासकीय व्यक्तींची नावेही समोर आणली. यात रुपाली चाकणकर, त्यांचा मुलगा सोहम चाकणकर, तसेच प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रफुल चाकणकर आणि संकेत सायकर यांची नावे कॉल डेटामध्ये आढळल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. दमानिया यांनी पुढे सांगितले की, रुपाली चाकणकर यांनी अलीकडेच फेसबुक पोस्टद्वारे आपल्यावर मीडिया ट्रायल होत असल्याचा आरोप केला होता.
दरम्यान, रुपाली चाकणकर या सध्या माध्यमांपासून दूर असल्याचा दावा करत दमानिया यांनी इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्सची यादीही पत्रकारांसमोर सादर केली. या आरोपांवर रुपाली चाकणकर यांची अधिकृत प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Apr 15, 2026 12:55 PM
Follow Us