Anjali Damania : विपुल दुशी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का? दमानियांचा संतप्त सवाल
Vaishnavi Hagawane Case Updates : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून करण्यात आलेल्या अजब युक्तिवादावर अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
वकील विपुल दुशी घरगुती हिंसाचाराचं समर्थन करता आहेत का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. बार असोसिएशनने विपुल दुशी यांची सनद रद्द करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात विपुल दुशी हे हगवणे कुटुंबाचे वकील आहेत. काल शिवाजीनगर सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी दुशी यांनी युक्तिवाद करताना वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर बोट ठेवलं होतं. तसंच नवऱ्याने प्लॅस्टिकच्या छडीने मारणं म्हणजे मारहाण होते का? असा अजब सवाल देखील त्यांनी या युक्तिवादात उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली आहे. याच संदर्भात अंजली दमानिया यांनी देखील वकील दुशी यांच्यावर टीका करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

