Anjali Damania Video : ‘मुंडेंच्या सांगण्यावरून 3 माणसं काम करत होती अन्…’, थेट नावचं घेतली; दमानियांचा गंभीर आरोप
अंजली दमानिया यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. अंजली दमानिया यांनी ट्वीट करून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. बघा नेमकं काय म्हटलं?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी एक ट्वीट करून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून तीन माणसं काम करत होती, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. मुंडेंवर आरोप करताना शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे, सारंग आंदळे यांच्या नावाचा उल्लेख दमानिया यांनी केलाय. ‘गेले काही दिवस एक व्यक्ती मला काही माहिती देण्यासाठी बरेच फ़ोन करत होती. त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मंत्री धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून ( व्हॉट्सअप वर संपर्क ठेऊन) खालील माणसे काम करत होती. शिवलिंग मोराळे – ज्यांनी स्कॉर्प्यूओ मधून कराड ला CID ऑफिस मधे आणले. बालाजी तांदळे- ज्यांनी पोलिसांना घेऊन आरोपींचा शोध घेतला आणि सारंग आंधळे – माहिती देणे… “म्हणून ह्यांना अटक होणार नाही” कारण तसे झाले तर त्यांचे फ़ोन जप्त होतील आणि मग त्यामागे मंत्री धनंजय मुंडे आहे हे स्पष्ट होईल. ही मला मिळालेली माहिती, मी पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी याचा तपास करावा. मी या माहिती धनंजय देशमुख यांच्या साडूभाऊंशी बोलले. ते म्हणाले, बालाजी तांदळे नी स्वतः ही माहिती त्यांना सांगितली होती की “आरोपींना शोधण्यासाठी आमच्या २०० गाड्या फिरत होत्या. त्यांना आम्ही पकडले, पोलिसनी नाही”. हे कदाचित स्वतःला आणि वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी या लोकांचा बळी द्यावा असे ठरले असेल, असं या वक्तीने सांगितल्याचे दमानिया यांनी म्हटले.