Anjali Damania Video : धनंजय मुंडेंकडून पावणे 300 कोटींचे ‘हे’ 5 घोटाळे, अजंली दमानियांचा गौप्यस्फोट, वाचली घोटाळ्यांची मालिका
बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे आधीच अडचणीत सापडलेल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यांनिशी घोटाळ्यांची मालिका वाचत धनंजय मुंडे यांच्यावर कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप केले आहे. केवळ आरोपच […]
बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे आधीच अडचणीत सापडलेल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यांनिशी घोटाळ्यांची मालिका वाचत धनंजय मुंडे यांच्यावर कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप केले आहे. केवळ आरोपच नाही तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील सरकारकडे केली आहे. अंजली दमानिया यांनी आज सकाळी ११ वाजता एक पत्रकार परिषद घेऊन विविध घोटाळ्यांचे पुरावे सादर करत धनंजय मुंडे यांच्यावर एकच हल्लाबोल केला. धनंजय मुंडे यांच्याकडून पावणे ३०० कोटींचे ५ घोटाळे झाल्याचे म्हणत अजंली दमानियांनी मोठा गौप्यस्फोट केला. यामध्ये
धनंजय मुंडेंनी ९० रुपयांची नॅनो युरियाची बॉटल २२० रूपयांना विकत घेतली
धनंजय मुंडेंनी नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या खरेदीत ८८ कोटींचा घोटाळा केला
धनंजय मुंडेंनी नॅनो डीएपीची २६१ रूपयांची बॉटल ५९० रूपयांना खरेदी केली १६ मार्च रोजी याचे पैसे दिले आणि ३० मार्चला निविदा काढली.
२ हजार ४५० रूपयांचे फवारणी यंत्र ३ हजार ४२५ रूपयांना घेतलं. २८ मार्च रोजी याचे पैसे दिले आणि ५ एप्रिलला निविदा काढली.
गोगलगायीसाठी वापरलं जाणाऱ्या औषध खरेदीतही धनंजय मुंडेंकडून घोटाळा. ८१७ रूपये प्रतिकिलोचं औषध १ हजार २७५ रूपये प्रतिकिलो दराने खरेदी केलं. १६ मार्च रोजी याचे पैसे दिले आणि ९ एप्रिलला याची निविदा काढली. हे सर्व गैरव्यवहार लपवण्यासाठी बॅक डेटेट पत्रं दिली गेलीत
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

