भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली दमानियांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे एकच खळबळ
भोंदू अशोक खरातमुळे राज्याची अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पार धुळीस मिळाली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्याने मोठी फसवणूक केली आहे. इतकेच नाही, तर त्याने मोठमोठ्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. या प्रकरणात अनेक नेतेदेखील सामील आहेत, असा दावा केला जात होता.
भोंदू अशोक खरातमुळे राज्याची अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रतिमा पार धुळीस मिळाली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांची, शेतकऱ्यांची त्याने मोठी फसवणूक केली आहे. इतकेच नाही, तर त्याने मोठमोठ्यांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. या प्रकरणात अनेक नेतेदेखील सामील आहेत, असा दावा केला जात होता. आता याच प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. या फोटोमध्ये चंद्रकांत पाटील हे अशोक खरात यांच्या पाया पडताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, हे भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील, ‘कमीत कमी स्वतःचं वय तरी पाहायचं होतं, हीच मंत्र्यांची परिपक्वता असेल, तर देवा तुच देश वाचव.’ त्यांनी यापूर्वीही या प्रकरणात अनेक आरोप केले होते. तसेच, काही मोठ्या नेत्यांनी अशोक खरात याच्याशी संपर्क साधल्याचाही दावा त्यांनी केला होता.
या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली असून विरोधकांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Published on: May 14, 2026 10:58 AM
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

