वृद्धाश्रमामध्ये टाकून जगवतात, तसंच…; राऊतांचा नारायण राणेंवर निशाणा
संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राणे यांचे दुकान तीन वेळा बंद झाल्याचा दावा करत, राऊत यांनी त्यांना "मेहरबानीवर जगणारे" म्हटले आहे.
नारायण राणे यांच्या दुकान आतापर्यंत तीन वेळा बंद झालं आहे. ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांचे दुकान बंद केलं. मग ते काँग्रेस पक्षात गेले तेव्हा देखील त्यांचे दुकान बंद केलं. आता ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, ते मेहरबानीवर जगत आहेत, असं खासदार संजय राऊत यांनी राणें विषयी बोलताना म्हंटलं आहे. जसं एखाद्याला वृद्धाश्रमामध्ये टाकून जगवतात, तसं ते कृत्रिम ऑक्सिजन वरती जगत आहेत. त्यांनी आमच्या दुकान बंद करण्याची भाषा करू नये, असंही टोला यावेळी राऊतांनी लगावला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, हे सगळे नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे दहीहंडी वीर आहेत. त्यांच्या हातातील मुरली वाजवते फिरतात. 2029 च्या निवडणुकीत कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे, हे आपल्याला कळेल मी वारंवार सांगत आहे नारायण राणे यांनी आपल्या वयाचे भान ठेवावं आता त्यांनी जुनी भाषा करू नये. शिवसेनेमध्ये असताना ती भाषा शोभायची, अशी टीका देखील राऊत यांनी केली.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

