Video : हल्ला करणाऱ्याला बसेल शॉक! Solapurच्या अंकितानं बनवला वूमन सेफ्टी सूट
सोलापूरच्या अंकिता रोटे या इंजिनिअरिंग(Engineering)च्या विद्यार्थिनीनं वुमन सेफ्टी सूट(Women safety suit)ची निर्मिती केली आहे. महिला, तरुणींना स्वसंरक्षणासाठी सूट महत्त्वपूर्ण असणार आहे. छेडछाड झाल्यावर सूटच्या माध्यमातून कुटुंबीयांना आणि पोलिसांच्या मोबाइलवर मेसेज जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही अंकितानं तयार केलेल्या सूटची दखल घेतली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी सोलापूरच्या अंकिता रोटे या इंजिनिअरिंग(Engineering)च्या विद्यार्थिनीनं वुमन सेफ्टी सूट(Women safety suit)ची निर्मिती केली आहे. महिला, तरुणींना स्वसंरक्षणासाठी सूट महत्त्वपूर्ण असणार आहे. छेडछाड झाल्यावर सूटच्या माध्यमातून कुटुंबीयांना आणि पोलिसांच्या मोबाइलवर मेसेज जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही अंकितानं तयार केलेल्या सूटची दखल घेतली आहे. लवकरच महाराष्ट्र पोलिसांना या सूटचा डेमो दिला जाणार आहे. आताच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. घराच्या बाहेर महिला सुरक्षित नाहीत. अशावेळी या सूटवर पॉवर ऑन सर्किट आहे. ते मोबाइलशी कनेक्ट आहे. त्यात मेसेजच्या माध्यमातून लोकेशन आणि मदत असं हे फंक्शन असणार आहे. जो हल्ला करणार, त्याला शॉक बसणार असल्याची रचना या सूटमध्ये करण्यात आलीय.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

