रोहित पवारांच्या मतदारसंघात दुसऱ्या पवार यांचे बॅनर झळकले, रोहित पवार म्हणाले…
शरद पवारांनी एक मराठा लाख मराठा म्हणावे या राधाकृष्ण विखेंच्या आव्हानाला रोहित पवारांनी प्रतिप्रश्न केलाय. राधाकृष्ण विखे ज्या विभागाचे मंत्री आहे त्या विभागातील दूधाचे दर कमी झाले ते वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवे असा टोला लगावलाय.
अहमदनगर | 16 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक भाजप आमदार राम शिंदे यांनी मोठी खेळी खेळलीय. आमदार राम शिंदे यांच्या घराच्या कार्यक्रमाला अजितदादा यांचा मुलगा पार्थ पवार यांनी हजेरी लावली. त्यानिमित्त आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात पार्थ पवार यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मोठे विधान केलंय. त्याचवेळी त्यांनी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या टीकेला उत्तर दिलंय. अनेक नेते आता जातीवादावर बोलायला लागले आहे. कदाचित लोकसभा निवडणुका जवळ आल्याने ते बोलत असतील. नेत्यांच्या अशा वक्तव्यामुळे जनतेचे महत्वाचे विषय बाजूला राहतात असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
Latest Videos
Latest News