Special Report | कुटुंबाला ED पासून वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना विचारुनच शिंदे गटात आलो; अर्जुन खोतकरांनी जाहीरपणे सांगितलं

अर्जुन खोतकरांची याआधी दिल्लीत मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक झाली. तेव्हापासूनच खोतकर शिंदे गटात जातील हे स्पष्ट झालं होतं. अर्जुन खोतकरांच्या मागे ईडी लागलीय. त्याचा उल्लेखही वारंवार खोतकरांनी केलाय.ईडीच्या रडारवर अर्जुन खोतकरही आहेत, तब्बल 78 कोटी 38 लाखांची संपत्ती जप्त झालीय. ज्यात जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची जमीन, कारखान्याची इमारत आणि कारखान्याची यंत्रसामग्री जप्त केलीय. माझं कुटुंब अडचणीत असल्यानं उद्धव ठाकरेंनी सेफ करण्यासाठी होकार दिल्याचंही खोतकर सांगतायत.

Special Report | कुटुंबाला ED पासून वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना विचारुनच शिंदे गटात आलो; अर्जुन खोतकरांनी जाहीरपणे सांगितलं
| Updated on: Jul 30, 2022 | 9:20 PM

मुंबई : ईडीच्या(ED) कारवायांमुळं कुटुंब अडचणीत आहे. त्यामुळं सहारा शोधत शिंदे गटात सहभागी होत असल्याचं अर्जुन खोतकर(Arjun Khotkar ) म्हणालेत. उद्धव ठाकरेंशी( Uddhav Thackeray ) बोलूनच शिंदे गटात आल्याचं सांगताच खोतकर भावूकही झाले. अर्जुन खोतकरांची याआधी दिल्लीत मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक झाली. तेव्हापासूनच खोतकर शिंदे गटात जातील हे स्पष्ट झालं होतं. अर्जुन खोतकरांच्या मागे ईडी लागलीय. त्याचा उल्लेखही वारंवार खोतकरांनी केलाय.ईडीच्या रडारवर अर्जुन खोतकरही आहेत, तब्बल 78 कोटी 38 लाखांची संपत्ती जप्त झालीय. ज्यात जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची जमीन, कारखान्याची इमारत आणि कारखान्याची यंत्रसामग्री जप्त केलीय. माझं कुटुंब अडचणीत असल्यानं उद्धव ठाकरेंनी सेफ करण्यासाठी होकार दिल्याचंही खोतकर सांगतायत. तर अर्जुन खोतकर कामय स्वरुपी केले की काही काळापुरते?, असं वक्तव्य करुन शिवसेनेच्या निलम गोऱ्हेंनी वेगळ्याच चर्चेला हवा दिलीय. ईडीच्या कारवाईवरुन अर्जुन खोतकर उघडपणे बोलतायत. त्यामुळं परिस्थिती पाहून निर्णय घेतल्याचंही ते सांगतात. मात्र ईडी आम्ही नाही तर हायकोर्टाच्या आदेशावरुन कारवाई झाल्याचं दानवे म्हणालेत. केंद्राकडून ईडीचा वापर होत असल्याची टीका विरोधकांकडून वारंवार होते. पण आता शिवसेना सोडून शिंदे गटात येताना अर्जुन खोतकरांनी हे जाहीरपणे सांगितलंय. कुटुंबाला वाचवण्यासाठीच शिंदे गटात आलो हे सांगण्यासाठीही हिंमत लागते.

Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.