‘जोपर्यंत जनता सांगत नाही…तोपर्यंत मुख्यमंत्री…,’ केजरीवाल यांनी काय केली घोषणा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तब्बल 177 दिवसांनी जामीन मिळाला आहे. त्यानंतर त्यांनी थेट आता मुख्यमंत्री पद सोडण्याची घोषणा केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
अरविंद केजरीवाल यांना कालच सर्वोच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. जामीन देताना केजरीवाल यांनी मुख्यमंत्री कार्यालयात जायचे नाही आणि संबंधित कोणतीही कामे करायची नाही अशा अटी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्यावर लादल्या आहेत. यानंतर आज अरविंद केजरीवाल यांनी आपण दोन दिवसांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. आपण जनतेत पुन्हा जाऊन आणि आपल्याला जनता जोपर्यंत इमानदार आहे असे सांगत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही असे म्हटले आहे. तसेच दिल्लीतील विधानसभा निवडणूका फेब्रुवारीमध्ये आहेत. परंतू मी आयोगाला विनंती करतो की महाराष्ट्रातील निवडणूकासोबत नोव्हेंबरमध्ये निवडणूका घ्यावा असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Latest Videos
Latest News