4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM | 4 November 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 5 PM | 4 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 6:04 PM

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान संबंधित ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींच्या खंडणीचा आरोप एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर ठेवण्यात आला होता.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान संबंधित ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींच्या खंडणीचा आरोप एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणात आता एक मोठा खुलासा झाला आहे. शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानीचं एक सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलं आहे. एसआयटीच्या पथकाच्या हाती पुजा ददलानीचं सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुंबईच्या लोअर परळमध्ये पुजा ददलानीची कार दिसून आली आहे.